मसूर : मसूर पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर पोलीस पथकाने गत तीन दिवसांत वेगवेगळ्या गुन्ह्याखाली ७४ जणांवर धडक कारवाई करत सुमारे ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
संचारबंदीच्या काळात मसूर पोलिसांनी सुरुवातीपासूनच धडक मोहीम राबवल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या धडक मोहिमेअंतर्गत विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या तीन जणांवर कारवाई करून ३००० रुपये, विनाकारण फिरणाऱ्या ५१ जणांवर कारवाई करून २५५०० रुपये, विनामास्क फिरणाऱ्या नऊ जणांवर कारवाई करत ३९०० रुपये, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या ९ जणांवर कारवाई करत ५००० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे एकावर कारवाई करत १००० रुपये व आस्थापना उशिरापर्यंत चालू ठेवणे एकावर कारवाई करत १ हजार रुपये असा एकूण ३९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या धडक कारवाईत उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांना एएसआय ए.जी. तावरे, हेड कॉन्स्टेबल आर.बी. साळुंखे, पोलीस नाईक आर.डी. माने, पी.बी. सोरटे, वाय.के. पवार, कॉन्स्टेबल अमोल देशमुख, ए.ए. पाटील, पी.एच. पवार, व्ही.बी. डांगरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
१७मसूर
फोटो कॅप्शन : मसूर येथील मुख्य चौकात कारवाई करत असताना मसूर पोलीस.