चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:43 PM2019-09-21T13:43:06+5:302019-09-21T13:44:31+5:30
कृष्णानगर येथील परिसरात असणारे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे अकरा लाखांची रोकड चोरून नेली होती. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून, त्या माहितीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन टीम तयार केल्या असून या टीम विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.
सातारा : कृष्णानगर येथील परिसरात असणारे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे अकरा लाखांची रोकड चोरून नेली होती. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून, त्या माहितीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन टीम तयार केल्या असून या टीम विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.
कृष्णानगर येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम बुधवारी रात्री चोरट्यांनी फोडून तब्बल ११ लाखांची रोकड चोरून नेली होती. गॅस कटरच्या साह्याने चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे.
एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीची तोडफोड व रेकॉर्ड नष्ट केल्याने पोलिसांना याचा तपास लावणे मोठे आव्हान आहे. मात्र, या एटीएम सेंटरच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये काहीजण कैद झाल्याचे समोर आले आहे. या माहितीच्या आधारे चोरट्यांपर्यंत पोहचू, असा विश्वास पोलिसांना आहे.