वडूजमधील विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:39 AM2021-05-10T04:39:38+5:302021-05-10T04:39:38+5:30

वडूज : येथील भाग्योदय नगर, सुयोगनगर व कर्मवीर नगरमधील रस्त्याकडेला असलेल्या वीज खांबावरील विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ...

Power outage in Vadodara | वडूजमधील विद्युत पुरवठा खंडित

वडूजमधील विद्युत पुरवठा खंडित

Next

वडूज : येथील भाग्योदय नगर, सुयोगनगर व कर्मवीर नगरमधील रस्त्याकडेला असलेल्या वीज खांबावरील विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ‌नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. लॉकडाऊनमध्ये घरीच थांबलेल्या नागरिकांना आणि या तिन्ही नगरांतील वास्तव्यास असलेल्या लोकांना रस्त्यावर वीज नसल्याने अंधारातच चाचपडत राहावे लागत आहे.

०००००००

यात्रा साध्या पद्धतीने

सातारा : कोडोली येथील ग्रामदैवत श्री जानाई मानाई देवीची वार्षिक यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे ही यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. यात्रेतील करमणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच छबिना, पालखी मिरवणूकही रद्द केली होती.

००००००००

दुसऱ्याही दिवशी वरुणराजा बरसला

वडूज : खटाव तालुक्यातील हवामानात दोन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवू लागला होता. दुपारपासूनच वरूणराजा बरसल्याने हवेतील उकाडा कमी जाणवू लागला, तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सलग चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वातावरणातील हा अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी वर्गातून काही ठिकाणी समाधान, तर काही ठिकाणी नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.

०००००००

वृक्षारोपणास प्रारंभ

सातारा : झाडांचे महत्त्व सांगणारे, निसर्गात समतोल कसा राखावा याचे महत्त्व सांगणारे गीत प्रदर्शन करण्यात आले. सातारा चित्रपट महामंडळाचे महेश देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी सिराज काझी, हिरालाल आतार उपस्थित होते.

००००००००

रुग्णांचा खुलेआम वावर

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराशेजारी सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावरील गावातील कोरोनाबाधित रुग्ण वडूज शहरात विनाकारण ये-जा करताना दिसत असल्याच्या तोंडी तक्रारी वाढत आहेत. बाहेरगावातील, तसेच वडूज शहरातील बाधित रुग्णांचा खुलेआम वावर सुरू असल्याने शहरातील बाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Web Title: Power outage in Vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.