पुसेसावळी : पुसेसावळीसह परिसरातील पिके पाण्याअभावी जळून जातील की काय, ही भीती असतानाच मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुसेसावळीसह परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. परिसरातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी पुसेसावळी, चोराडे, रहाटणी, वडगाव (ज. स्वा), वांझोळी, लाडेगाव, वडी, कळंबी, पळशी, शेनवडी, म्हासुर्णे, गोरेगाव याठिकाणी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास सर्वत्र पावसाच्या हलक्या सरी पडल्याने शेतातील पिकांना पाणी मिळाले. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.