वेण्णानगर येथे मटका अड्ड्यावर छापा ; नऊजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:59 PM2019-10-04T12:59:29+5:302019-10-04T13:00:49+5:30

वेण्णानगर, ता. सातारा येथे जलसंपदा विभागाच्या रिकाम्या खोल्यांच्या आडोशाला एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

Print out the Matka base at Vennanagar; Nine were in custody | वेण्णानगर येथे मटका अड्ड्यावर छापा ; नऊजण ताब्यात

वेण्णानगर येथे मटका अड्ड्यावर छापा ; नऊजण ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देवेण्णानगर येथे मटका अड्ड्यावर छापा तत्काळ छापा टाकून नऊजण ताब्यात

सातारा : वेण्णानगर, ता. सातारा येथे जलसंपदा विभागाच्या रिकाम्या खोल्यांच्या आडोशाला एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

राजेंद्र सदाशिव साबळे (रा. साबळेवाडी, ता. सातारा), धनाजी मधू पवार , नथू श्रीपती पवार, शांताराम शिवराम पवार (दोघे रा. आकले, ता. सातारा) रवींद्र मुरलधीर मतकर (रा. प्रतापगंज पेठ,सातारा) शंकर धोंडीराम चव्हाण (रा. कामथी, ता. सातारा) चंद्रकांत रघूनाथ वाघमळे, आकाश शहाजी गोडसे (दोघे रा. कण्हेर, ता. सातारा), पारख गोपाळ सोनावणे (रा. गवडी, ता. सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेण्णानगर (ता. सातारा) येथे असलेल्या जलसंपदा विभागाच्या इमारतीच्या आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी तेथे तत्काळ छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे २१ हजार १२५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई हवालदार सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांनी केली.

Web Title: Print out the Matka base at Vennanagar; Nine were in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.