जनावरांच्या चाऱ्यांसाठी चक्क बेबीकॉर्न मक्याचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:56 AM2019-11-24T00:56:06+5:302019-11-24T00:56:16+5:30
सूर्यकांत निंबाळकर । आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील तरुणांनी एकत्र गट शेतीतून बेबीकॉर्न मक्याचे पीक घेऊन एकाच वेळी ...
सूर्यकांत निंबाळकर ।
आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील तरुणांनी एकत्र गट शेतीतून बेबीकॉर्न मक्याचे पीक घेऊन एकाच वेळी पैसा व जनावरांना चारा उपलब्ध होत आहे. बेबीकॉर्न मका पिकातून दुग्ध उत्पादन वाढून दुष्काळी भागातील बळीराजाला आर्थिक समृद्धी मिळत आहे.
फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी ज्वारी, बाजरी पिके घेऊन त्यामधून धान्य व चारा उपलब्ध केला जात आहे. पण त्यामधून म्हणावी त्या प्रमाणात दूध उत्पादन वाढत नाही. त्यानंतर शेतकरी दूध व्यवसायासाठी चारा पीक म्हणून मका, कडवळ घेतले जात होते; पण यापासून फक्त चाराच मिळतो दुहेरी उत्पादन मिळत नव्हते.
पाच वर्षांपासून पश्चिम भागातील दुष्काळी भागातील शेतकरी बेबीकॉर्न मक्याची पेरणी, लागवड करत आहेत. त्याचा फायदा होत आहे, अशी माहिती सासवड (झणझणे) येथील पांडुरंग अनपट यांनी दिली.
प्रोटीन अन् व्हिटामीन
बेबीकॉर्न मका पीक वर्षभर पेरणी व लागवड सरी पद्धतीने करता येते. पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतर काढणी सुरुवात केली पाहिजे. जादा उष्णता असताना कणसे तोडणी करू नये. सकाळी तोडणी करावी लागते. पेरणीसाठी एकरी आठ किलो बियाणे लागते. बेबीकॉर्न नंतर मका चारा म्हणून उपलब्ध होताना त्यामध्ये प्रोटीन, विटामीन उपलब्ध होते.
मोठ्या हॉटेलातून वाढती मागणी
या प्रकारच्या मका पिकामुळे मक्याची कोवळी तीन ते चार इंच लांबीची कणसे काढून ती सोलून ती पंचतारांकित हॉटेल व परदेशात निर्यात केली जातात. त्याचा एका किलोचा दर शेतकऱ्यांना ४० ते ४५ किलो सरासरी दर मिळतो. त्यामुळे आर्थिक फायदा मिळतो. मका व कणसाचा पाला मिळ्तो.