शेंद्रे :
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोनगाव ग्रामस्थांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे नियोजन केले आहे. सोनगावमध्ये रोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, बुधवारी बाधितांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. त्यामुळे गावातील लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. या जनता कर्फ्यूला समस्त सोनगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
जनता कर्फ्यूमुळे परिसरातील सर्व व्यवहार बंद असून सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. पाठीमागील काही दिवसांपासून सोनगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यावर आळा घालण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोनगाव ग्रामस्थांनी व कोरोना समितीने जनता कर्फ्यूचे नियोजन केले आहे. या जनता कर्फ्यूमुळे सोनगावच्या कायम गजबजलेल्या चौकात एकदम शुकशुकाट आहे. यामुळे सोनगावात कमालीची शांतता आहे.
०५सोनगाव
फोटो : सोनगाव, ता. सातारा येथे जनता कर्फ्यूमुळे सर्व व्यवहार बंद आहेत.