कोरेगावात रेल्वे मालधक्का होण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:11 AM2021-02-21T05:11:29+5:302021-02-21T05:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : ‘कोरेगाव हे व्यापारी केंद्र असून, साताऱ्यासह लगतच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कोरेगाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : ‘कोरेगाव हे व्यापारी केंद्र असून, साताऱ्यासह लगतच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कोरेगाव रेल्वे स्थानक
परिसरात मालधक्का होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भरत मुळे यांनी दिली.
मुळे यांनी शुक्रवारी दुपारी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत कोरेगाव रेल्वे स्थानकास भेट देऊन पाहणी केली. यावेळी वरिष्ठ स्टेशन प्रबंधक भरतलाल मीना व प्रदीप फाळके यांनी त्यांचे स्वागत केले. रेल्वेच्यावतीने सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती फाळके यांनी दिली.
मुळे म्हणाले, ‘कोरेगावसाठी रेल्वेने सुविधा वाढविणे गरजेचे आहे. रेल्वेकडे मुबलक जागा असल्याने मालधक्कासह एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, पुणे-मिरज-कोल्हापूर दरम्यान जलद पॅसेंजर सुरू करावी, तिला कोरेगावात थांबा देण्यात यावा, रेल्वे कँटीनधारकांप्रमाणेच फेरीवाले यांची वैद्यकीय तपासणी करावी, मगच त्यांना विक्री परवाना द्यावा. कचरा व्यवस्थापन फेरीवाले यांनी स्वत: करावे, यासाठी संबंधितांना समज द्यावी, आदी सूचना लवकरच होणाऱ्या विभागीय सल्लागार समिती सभेत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, महिला आघाडी तालुकाध्यक्षा उज्ज्वला निकम, उपाध्यक्षा सुषमा निकम, कायदा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भूतकर, श्रेयस काणे, भाऊ मतकर, राजेंद्र मतकर, जवानसिंग घोरपडे, महेश वडगावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
(चौकट)
महाराष्ट्र एक्स्प्रेसला सवलत द्या...
रेल्वेने कोविडमुळे आरक्षण व्यवस्थेत बदल केला आहे, तो समाधानकारक आहे. मात्र, गोंदिया-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसचे
बुकिंग एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतरही पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत करता येण्यासाठी संगणकीकृत बुकिंग सेवा उपलब्ध ठेवावी, कारण एक्स्प्रेस
सुटण्यापूर्वी बुकिंग बंद केले जाते. मात्र, ही एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास करते. त्यामुळे या एक्स्प्रेसला
विशेष सवलत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले.
फोटोनेम :२०कोरेगाव
फोटो ओळ : भरत मुळे यांच्यासमवेत अमोल भूतकर, महेश वडगावी, प्रदीप फाळके, बबनराव कांबळे, संतोष जाधव, उज्ज्वला निकम, सुषमा निकम, आदी उपस्थित होते.