खटाव : खटावसह परिसरात शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाने विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे खटावचे नागरिक हैराण झाले होते. शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचे काम बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. काढणीला आलेला व काढून टाकलेला कांदा या अवकाळी पावसात सापडल्याने नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे, तर द्राक्ष बागांचेही नुकसान झाले आहे.
फोटो ओळ : खटाव येथे शनिवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. (छाया : नम्रता भोसले)
\\\\\\\\\\\\\\\\\\