साताऱ्यात पावसाची रिमझिम, पहाटेपासून ढगाळ वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:40 PM2019-06-13T12:40:36+5:302019-06-13T12:41:11+5:30
साताऱ्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी पावसाची रिमझिम सुरू होती. शहरात पहाटेपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून असूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सातारकर रेनकोट, छत्र्या घेऊनच सकाळी घरातून बाहेर पडत होते.
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी पावसाची रिमझिम सुरू होती. शहरात पहाटेपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून असूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सातारकर रेनकोट, छत्र्या घेऊनच सकाळी घरातून बाहेर पडत होते.
साताऱ्यात गेल्या पाच दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरत असल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
सातारा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : सातारा २.७५, जावळी १५.१७, पाटण ३.४५, कऱ्हाड २.७७, कोरेगाव २.११, खटाव २.८, माण ०.२९, खंडाळा १.७५, वाई ३.४०, महाबळेश्वर २२.७३.