सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:37 AM2021-03-19T04:37:54+5:302021-03-19T04:37:54+5:30

खासदार श्रीनिवास पाटील हे लोकसभा अधिवेशनानिमित्त दिल्ली येथे असून, त्यांनी यासंदर्भात प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली आहे. कोरोना संसर्गामुळे ...

Raise the age limit for recruitment! | सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवा!

सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवा!

Next

खासदार श्रीनिवास पाटील हे लोकसभा अधिवेशनानिमित्त दिल्ली येथे असून, त्यांनी यासंदर्भात प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली आहे. कोरोना संसर्गामुळे गत वर्षापासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सैनिक भरती प्रक्रियेवर झाला असून, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रिया झालेली नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया कोल्हापूर येथे घेण्यात येते. विशेषत: सातारा जिल्ह्याला फार मोठी सैनिकी परंपरा असून, ती आजतागायत सुरू आहे. जिल्ह्यातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. येथील बहुतांश युवक सैन्यदलात जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी ते दोन-दोन वर्षे अगोदर शारीरिक व अन्य परीक्षेची तयारी करत असतात. सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरूण त्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र, सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत असल्याने त्यांची आलेली संधी हुकत असून, त्यांचे स्वप्न धोक्यात येत आहे.

कोल्हापूर येथे होणारी भरती पुन्हा काही काळ स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने हजारो तरुणांची संधी हुकण्याची शक्यता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने या भरती आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आणखीन पुढे लांबण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे सध्या इच्छुक असलेल्या तरुणांची वयोमर्यादा संपण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत काही तरुणांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन याविषयीची खंत व्यक्त केली होती.

फोटो : १८केआरडी०२

कॅप्शन : दिल्ली येथे खासदार श्रीनिवास पाटील यांनी रक्षाप्रमुख जनरल बिपीन रावत यांची भेट घेऊन सैन्य भरतीची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी केली.

Web Title: Raise the age limit for recruitment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.