सातारा : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती असतानाही जिल्ह्यात रंगपंचमी साजरी करण्यात आली, पण या रंगपंचमीत उत्साह जाणवला नाही, तर लहानग्यांनी ऐकमेकांना रंग लावत रंगोत्सव साजरा केला, पण सार्वजनिकरीत्या रंगपंचमी साजरी झालीच नाही.
होळी संपली की, रंगपंचमीचे वेध लागतात, पण या वर्षी रंगपंचमीचा सण कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला. बाजारपेठेत मुलांसाठी पिचकाऱ्या उपलब्ध झाल्या होत्या, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी कमी होती, तर शुक्रवारी रंगपंचमी साजरी झाली, पण उत्साह कमी जाणवला.
सातारा शहरात तर घरी आणि अपार्टमेंटच्या ठिकाणी काही प्रमाणात रंगपंचमी साजरी झाली. लहान मुलांनी ऐकमेकांना रंग लावत रंगोत्सव साजरा केला. मात्र, साताऱ्यात सार्वजनिक ठिकाणी रंगपंचमीचा माहौल दिसून आला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.
फोटो आहे...
..........................................................