साताऱ्यात विक्रमी मत्स्य उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:53 AM2019-11-24T00:53:31+5:302019-11-24T00:53:37+5:30
सातारा : मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन आणि संवर्धन यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मोठी वाढ झाली असून, यावर्षी ...
सातारा : मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन आणि संवर्धन यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मोठी वाढ झाली असून, यावर्षी जिल्ह्यात १५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले आहे.
जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त कार्यालयात नुकताच ‘जागतिक मत्स्य दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मत्स्यशेती व आधुनिक तंत्रज्ञान, पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन, नीलक्रांती योजना, बायोफ्लोक पद्धतीने मत्स्यसंवर्धन, मोती संवर्धन याबाबत माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये तसेच तलावांमध्ये आणि शेततळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर मत्स्य उत्पादन घेतले जात असून, कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस, वाम, मरळ या जातीच्या माशांचे चांगले उत्पादन घेतले जात आहे.
जिल्ह्यातील कण्हेर, धोम, तारळी, उरमोडी या धरणांमध्ये आणि काही खासगी तलावांमध्येही मोठ्या प्रमाणावर मत्स्य उत्पादन घेतले जात आहे. आधुनिक पद्धतीने याठिकाणी मत्स्य उत्पादनाची व्यवस्था करण्यात आल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. नीलक्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देऊन मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याला मत्स्य विभागाची साथ मिळत असल्याने पुढील दोन वर्षांत माशांची मोठी बाजारपेठ जिल्ह्यात निर्माण होणार आहे. यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी मत्स्यनिर्मिती केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. त्याचा मत्स्य उत्पादकांना नक्कीच फायदा होईल.
जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय संस्था
च्मच्छिमार सहकारी ६९
संस्था
च्मच्छिमार सहकारी ३५१३
संस्थांचे सभासद
च्मच्छिमार सहकारी १
संघ
च्क्रियाशील मच्छिमार ५६१८
च्अंशकालीन मच्छिमार ३४३७
च्जिल्हा परिषदेचे २२०६
पाझर तलाव
च्नगरपरिषदेचे तलाव ६५