पसरणी आरोग्य उपकेंद्रास लस साठवणुकीसाठी रेफ्रिजरेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:06+5:302021-04-12T04:36:06+5:30
वाई : वाई तालुक्यातील पसरणी आरोग्य उपकेंद्रास कोरोना प्रतिबंधक लस व्यवस्थित ठेवता यावी यासाठी ग्रामपंचायतीने रेफ्रिजरेटर भेट दिला आहे. ...
वाई : वाई तालुक्यातील पसरणी आरोग्य उपकेंद्रास कोरोना प्रतिबंधक लस व्यवस्थित ठेवता यावी यासाठी ग्रामपंचायतीने रेफ्रिजरेटर भेट दिला आहे. यामुळे कोरोना लसीकरणासाठी फायदा होणार आहे.
मालतपूर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पसरणी उपकेंद्रात पसरणी ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याचे सुतोवाच करण्यात आले होते. त्यासाठी सरपंच हेमलता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्यांनी व तरुणांनी जनजागृती केली. अनेक ग्रामस्थांनी नाव नोंदणी केली, तर कोरोना लसीची साठवणूक थंड वातावरणात करावयाची असल्याने पंचायत समितीने ग्रामपंचायतीस उपकेंद्रांना रेफ्रिजरेटर देण्यास कळविले होते. त्यानुसार तालुक्यात सर्व प्रथम पसरणी ग्रामपंचातीने रेफ्रिजरेटर देण्याचा निर्णय घेत तातडीने अंमलबजावणी केली.
यावेळी स्वप्निल गायकवाड, अमोल महांगडे, संतोष महांगडे, शिवाजी महांगडे, ईश्वर साळुंखे, अमोल साळुंखे, शंकर साळुंखे, अविनाश साळुंखे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : वाई तालुक्यातील पसरणी आरोग्य उपकेंद्रास रेफ्रिजरेटर देण्यात आला. यावेळी स्वप्निल गायकवाड, अमोल महांगडे, संतोष महांगडे, शिवाजी महांगडे, ईश्वर साळुंखे, अमोल साळुंखे आदी उपस्थित होते.