सावित्रीबाई फुलेंचे स्मरण प्रत्येक स्त्रीचे आद्य कर्तव्य : पूनम ससाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:11 AM2021-03-13T05:11:49+5:302021-03-13T05:11:49+5:30
वाई : ‘सावित्रीबाई फुलेंचे स्मरण हे प्रत्येक स्त्रीचे आद्य कर्तव्य आहे. पुण्यस्मरण करत असताना त्यांच्या पावलांवर पावले ठेवत असताना. ...
वाई : ‘सावित्रीबाई फुलेंचे स्मरण हे प्रत्येक स्त्रीचे आद्य कर्तव्य आहे. पुण्यस्मरण करत असताना त्यांच्या पावलांवर पावले ठेवत असताना. कोरोनाच्या रुग्णाला वाळीत न टाकता त्यांना होता होईल तेवढी मदत केली पाहिजे,’ असे मत लेखिका पूनम ससाणे यांनी व्यक्त केले.
येथील पुण्यस्मरण स्तंभ मंचच्यावतीने किसन वीर चौक वाई येथे सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त प्रतिमपूजन व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखिका पूनम ससाणे व किसन वीर कॉलेजच्या प्रा. सरिता वैराट उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.
प्रा. वैराट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणात घेतला. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वास सोनावणे यांनी कष्ट घेतले. कार्यक्रमासाठी भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, चिटणीस यशवंत लेले,
सागर जाधव, गोपाळ गरुड, महावीर कुपडे, मनीषा घैसास, विक्रम शिंदे, तेजस जमदाडे, दीपक जाधव, अशोक येवले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश भोज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. यशवंत लेले व उदय शिंदे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.