वसंतगडावर ढासळलेल्या बुरुजांची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:39 AM2021-01-23T04:39:57+5:302021-01-23T04:39:57+5:30
वसंतगडावर ५०० रोपांची लागवड करण्यात आली असून या झाडांचे संगोपन केले जात आहे. गडाच्या दुर्गसंवर्धन कार्यात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे ...
वसंतगडावर ५०० रोपांची लागवड करण्यात आली असून या झाडांचे संगोपन केले जात आहे. गडाच्या दुर्गसंवर्धन कार्यात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे दिनेश कदम व त्यांच्या पन्नास मावळ्यांची टीम सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून येऊन सामील झाली. माणगाव प्रतिष्ठान कोल्हापूर, तांबवे येथील कोयनाकाठ ट्रस्ट परिवाराचे मावळे व टीम वसंतगड यांनी संयुक्तपणे ही दुर्गसंवर्धन मोहीम राबवली. सर्वांनी विविध प्रकारे गडावर श्रमदान केले. विशेष म्हणजे कोयनाकाठ परिवार तांबवेच्या बालचमूंनीही गडावरील झाडांना पाणी देण्याचे कौतुकास्पद कार्य केले. उत्सव मंगल कार्यालय व पांडुरंग खुडे यांनी मावळ्यांच्या जेवण व नाष्ट्याची सोय केली. दिनेश कदम यांनी अभिनेते व समाजसेवक सयाजी शिंदे यांना प्रत्यक्ष फोन करून वसंतगड संवर्धनासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
शिवाजी पाटील, दत्तात्रय जामदार, रामभाऊ माळी, डॉ. धनंजय जाधव, अर्जुन कळंबे, सचिन महाडिक, नितीन पाटील व टीम वसंतगडच्या मावळ्यांनी अन्य मावळ्यांचा यावेळी श्रमदानाबद्दल सत्कार केला. वसंतगडचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या शिवकार्यात विभागातील सर्व गावातील तरुण व ग्रामस्थांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन टीम वसंतगडच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो : २२केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यातील वसंतगडावर दुर्गप्रेमींनी श्रमदान करून ढासळलेल्या बुरुजांची दुरुस्ती केली आहे. तर स्वच्छतेमुळे गडाचे रूपडे पालटले आहे.