वसंतगडावर ५०० रोपांची लागवड करण्यात आली असून या झाडांचे संगोपन केले जात आहे. गडाच्या दुर्गसंवर्धन कार्यात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे दिनेश कदम व त्यांच्या पन्नास मावळ्यांची टीम सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून येऊन सामील झाली. माणगाव प्रतिष्ठान कोल्हापूर, तांबवे येथील कोयनाकाठ ट्रस्ट परिवाराचे मावळे व टीम वसंतगड यांनी संयुक्तपणे ही दुर्गसंवर्धन मोहीम राबवली. सर्वांनी विविध प्रकारे गडावर श्रमदान केले. विशेष म्हणजे कोयनाकाठ परिवार तांबवेच्या बालचमूंनीही गडावरील झाडांना पाणी देण्याचे कौतुकास्पद कार्य केले. उत्सव मंगल कार्यालय व पांडुरंग खुडे यांनी मावळ्यांच्या जेवण व नाष्ट्याची सोय केली. दिनेश कदम यांनी अभिनेते व समाजसेवक सयाजी शिंदे यांना प्रत्यक्ष फोन करून वसंतगड संवर्धनासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
शिवाजी पाटील, दत्तात्रय जामदार, रामभाऊ माळी, डॉ. धनंजय जाधव, अर्जुन कळंबे, सचिन महाडिक, नितीन पाटील व टीम वसंतगडच्या मावळ्यांनी अन्य मावळ्यांचा यावेळी श्रमदानाबद्दल सत्कार केला. वसंतगडचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या शिवकार्यात विभागातील सर्व गावातील तरुण व ग्रामस्थांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन टीम वसंतगडच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो : २२केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यातील वसंतगडावर दुर्गप्रेमींनी श्रमदान करून ढासळलेल्या बुरुजांची दुरुस्ती केली आहे. तर स्वच्छतेमुळे गडाचे रूपडे पालटले आहे.