रस्त्याकडेची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:54 AM2021-02-26T04:54:00+5:302021-02-26T04:54:00+5:30
सातारा : साताऱ्यातील सदरबझार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत ...
सातारा : साताऱ्यातील सदरबझार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
०००००
कार्यालयात चिंता
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही मास्क न घालताच नागरिक विविध कामानिमित्ताने येत आहेत. त्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक ठिकाणी कार्यालयीन सेवकाला दारातच बसवले असून मास्क लावण्याबाबत आठवण करून द्यावी लागत आहे.
०००००००
शाळेतून बाहेर पडले की विद्यार्थी बेशिस्त
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. यातच पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. असंख्य पालकांनी त्यासाठी सहमती दिली आहे. शाळा प्रशासन काळजी घेत आहे. मात्र, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी थेट घरी न जाता बाहेर थांबत असतात. ही बाब धोक्याची ठरू शकते.
०००००
वीज ग्राहक हादरले
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव गेल्यावर्षी मार्चमध्ये झाला. तेव्हापासून अनेक वीज ग्राहकांनी वीजबिल माफ होईल या आशेवर ते भरलेले नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवरून थकबाकीदारांचे वीजजोडणी तोडण्याचे आदेश दिले आहेत. साताऱ्यात कारवाई सुरूही झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहक हादरले आहेत.
००००००००
ट्रकमुळे वाहतूक कोंडी
सातारा : साताऱ्यातील मोती चौक ते पाचशे एक पाटी चौक दरम्यानचा रस्ता अरुंद आहे. यामुळे अनेकजण जुना मोटारस्टॅण्ड मार्गे येतात, पण तेथेही मालवाहतूक करणारे ट्रक अनेक तास उभे असतात. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. कित्येक वेळेचा खोळंबा होत आहे.
००००
बाजारपेठेत सोशल डिस्टन्सचा फज्जा
सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. तरीही बाजारपेठेत काळजी घेतली जात नाही. अनेकजण विनामास्क फिरत असतात. तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
००००००००
सातारकर बेशिस्त
सातारा : बहुमजली इमारतीत राहणाऱ्या लोकांनी कचरा, घाण पाणी वरून टाकू नये, असे अपेक्षित आहे. मात्र, असंख्य सातारकर बेशिस्तपणे वरून कचरा, स्वयंपाक घरातील टरफलं, घाण पाणी वरच्या मजल्यावरून टाकत असतात. त्यामुळे खालच्या मजल्यावर राहत असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
०००००००
ढगाळ वातावरण
सातारा : साताऱ्यात गुरुवारी दुपारी काही वेळ ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे अंधारुन आले होते. त्यानंतर मात्र कडक ऊन पडले. तसेच पहाटे गारठा पडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे.
००००००
दरवाढीवर पांढऱ्या कांद्याचा उतारा
सातारा : सातारा बाजार समितीत शक्यतो लाल पांढरा येतो. मात्र, त्याचे दर गगनाला भिडलेले असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन कर्नाटकातून पांढरा कांदा दाखल झाला आहे. याची किंमत तीस रुपये किलो असल्याने सातारकरांमधून या कांद्याला मागणी वाढत आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंटमधूनही कांद्याला विशेष मागणी आहे.
००००
पोलिसांसमोरच मास्क
सातारा : साताऱ्यातील सार्वजनिक ठिकाणी असंख्य नागरिक विनामास्क वावरत आहेत. अनेक दुचाकीस्वार मास्क हनुवटीला लावून प्रवास करतात. एखाद्या चौकात पोलीस उभा असले तरच मास्क तोंडावर घेतला जातो. तेथून पुढे निघून गेल्यावर पुन्हा मास्क खाली ओढला जातो.
०००००
पाणीपुरवठा ठप्प
सातारा : साताऱ्यातील सदरबझार परिसरात असलेल्या कुरेशी गल्लीत गेल्या दोन वर्षांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे रहिवाशांना गैरसोयीचा समाना करावा लागत आहे. काही वेळेस विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.