महू धरणाच्या वळणावर एस. टी. - दुचाकीची धडक; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:07 AM2021-02-05T09:07:05+5:302021-02-05T09:07:05+5:30
पाचगणी : पाचवड - पाचगणी रस्त्यावर महू धरणावर एका वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने एस. टी. व दुचाकीची समोरासमोर ...
पाचगणी : पाचवड - पाचगणी रस्त्यावर महू धरणावर एका वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने एस. टी. व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार ओंकार शंकर गुरव (रा. वालुथ, ता. जावळी) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.
पाचवड - पाचगणी रस्त्यावर संध्याकाळी सहाच्या सुमारास पाचवडहून पाचगणीला जाणारी एसटी (एमएच १४ बीटी १५३३) व पाचगणीहून येणारी दुचाकी (एमएच ११ सीयू ०९६२) यांची वहागाव बसथांब्याच्या अलीकडच्या वळणावर समोरासमोर धडक झाली. समोरून आलेल्या दुचाकीस्वारास वाचवताना चालकाने एस. टी. संरक्षण कठड्यास धडकवली. यात रस्त्याच्या कडेचा संरक्षक कठडा तुटून खाली पडला. एस. टी.चेही नुकसान झाले आहे. एस. टी. धरणाच्या जलाशयात जाताजाता वाचली. दुचाकीवरील युवक ओंकार गुरव जखमी झाला. त्यास स्थानिकांनी कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
३१पाचगणी-अॅक्सिडेंट
पाचवड - पाचगणी मार्गावर दुचाकीस्वाराला वाचविताना एस. टी. संरक्षक कठड्याला धडकली. (छाया : दिलीप पाडळे)