कराड तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक होऊन तालुक्यातील २५८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार राजेंद्र तांबे यांनी दिली. नुकतीच ३१ मार्चला या समितीची बैठक तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत मंजुरीसाठी एकूण २६० अर्ज आले होते. यातील संजय गांधी निराधार योजनेसाठी १८३ अर्ज आले होते. यातील २ अर्ज अपात्र ठरले, तर १८१ अर्ज पात्र ठरले. श्रावणबाळ योजनेसाठी ७७ अर्ज आले होते, ते सर्व पात्र ठरले. एकूण २५८ अर्जांना मंजुरी देण्यात आली. समितीचे सदस्य गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, नायब तहसीलदार राजेंद्र तांबे, अव्वल कारकून जनार्दन ढवळे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. मार्चअखेर या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधारची प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:40 AM