प्राण्यांच्या मदतीला धावले सर्पमित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:46 AM2021-02-17T04:46:11+5:302021-02-17T04:46:11+5:30
साप असो अथवा वानर काहीवेळा आपण त्यांच्या जिवावर उठतो. मात्र सर्प मित्रांकडून अशा मुक्या प्राण्यांना जीवदान मिळत आहे. ही ...
साप असो अथवा वानर काहीवेळा आपण त्यांच्या जिवावर उठतो. मात्र सर्प मित्रांकडून अशा मुक्या प्राण्यांना जीवदान मिळत आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. रेठरे बुद्रुक येथील संतोष बनसोडे व त्यांच्या मित्रांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे मुक्या प्राण्यांचा जीव बचावला. आटके येथे नाग, तर वाठार येथे वानर जखमी स्थितीत आढळल्यानंतर संतोष बनसोडे यांनी या दोन्ही प्राण्यांना पकडून रेठरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. त्याठिकाणी डॉ. अमोल वंजारी यांनी तपासणी केली. नागाच्या तोंडावर व वानराच्या हाडाच्या हातावर शस्त्रक्रिया करून औषधोपचार करण्यात आले. उपचारानंतर याबाबतची माहिती वनपाल साळुंखे यांना देण्यात आली. वनपाल साळुंखे तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी नाग व वानर ताब्यात घेऊन त्यांनी सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.