सातारा : शिक्षक बदलीचा निवाडा चक्क इन कॅमेरा, एकमेकांवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:43 PM2018-07-18T13:43:21+5:302018-07-18T13:46:47+5:30
उच्च न्यायालयात गेलेल्या सातारा शिक्षक बदली प्रिक्रियेचा निवाडा आज जिल्हा परिषदेत चक्क इन कॅमेरा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर शिक्षकांनीच समोरासमोर आक्षेप घेतले. यावर निर्णय नंतर देण्यात येणार आहे.
सातारा : उच्च न्यायालयात गेलेल्या सातारा शिक्षक बदली प्रिक्रियेचा निवाडा आज जिल्हा परिषदेत चक्क इन कॅमेरा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर शिक्षकांनीच समोरासमोर आक्षेप घेतले. यावर निर्णय नंतर देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत गेल्या काही दिवसांपासून वादंग उठले आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आक्षेप काही शिक्षकांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने बुधवारी छत्रपती शिवाजी सभागृहात या बैठकीचे आयोजन केले आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी एच. व्ही. जाधव यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे.
यावेळी गुगल मॅपिंग, एसटीने दिलेले दाखले आणि गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चाचणीचे विश्लेषण करण्यात आले. विशेष म्हणजे या तिन्हींचे अंतर वेगवेगळे दाखवत असल्याने पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.