सातारा जिल्ह्यात २०२० मध्ये पोलिसांवर झालेे सर्वाधिक हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:39 AM2021-01-13T05:39:43+5:302021-01-13T05:39:43+5:30
सातारा : कोरोना काळात शासकीय कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर पोलीस आणि त्या खोलोखाल ...
सातारा : कोरोना काळात शासकीय कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर पोलीस आणि त्या खोलोखाल महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
फ्रंटलाइन वर्कर अशी पोलिसांची ओळख आहे. कोरोनाच्या महामारीत पोलिसांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. नागरिकांनी घरातून बाहेर येऊ नये, यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर होते. पण नागरिकांची काळजी घेत असतानाच काही माथेफिरू नागरिकांनी उलट पोलिसांवरच हल्ले केले. असे वर्षेभरात १३ पोलिसांवर हल्ले झाले आहेत. यातील काही हल्ले वाहतूक पोलिसांवरही झाले आहेत. गाडी अडवल्यानंतर अनेकण हुज्जत घालत असतात. त्यानंतर शाब्दीक बाचाबाचीतून पोलिसांवर हल्ले झाले आहेत. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींना तत्काळ अटकही केली आहे. सध्या हे सर्व गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. तसेच महसूल विभागातील तलाठी, तहसीलदार यांच्यावरही हल्ले झाले आहेत. ही संख्या ९ वर असल्याचे आकडेवारीतून दिसून आले.
१३ जणांवर कारवाई
सातारा शहर पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांवर हल्न्ला केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सातारा तालुका आणि शाहूपुरी, पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. तसेच महसूलचा सात गुन्हे दाखल आहेत. कऱ्हाड, माण, फलटण, महाबळेवर या ठिकाणीही पोलीस अन् महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत.
महसूल विभागाला केले जातेय टार्गेट
जिल्ह्यात रात्री अपरात्री वाळू चोरीच्या घटना घडत असतात. त्यावेळी कोणताही मागचा पुढचा विचार न करता वाळू चोर या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर पुन्हा टार्गेट करून त्यांच्याविरोधात अर्ज केले जातात.