सातारा : पोलीस मुख्यालयासमोरील सातारकरांचा लाडका शांतिदूत पक्ष्याचा पुतळा मूळ जागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:54 PM2018-02-26T15:54:57+5:302018-02-26T15:54:57+5:30
सातारा येथील पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविण्यात आला होता. सातारकरांच्या आंदोलनानंतर तो पुन्हा होता त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला. सातारकरांच्या लाडक्या शांतिदूत पक्षाची स्थापना करण्याचे काम सोमवारी सुरू केले.
सातारा : येथील पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविण्यात आला होता. सातारकरांच्या आंदोलनानंतर तो पुन्हा होता त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला. सातारकरांच्या लाडक्या शांतिदूत पक्षाची स्थापना करण्याचे काम सोमवारी सुरू केले.
शासकीय वाहनांना अडथळा होतो, असे कारण शांतिदूत पक्ष्याचा पुतळा काढला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या इच्छेखातर तो कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय सातारकरांच्या संतापानंतर रद्द केला होता. दरम्यान, हा पुतळा सातारकरांची अस्मिता असल्याने तो साताऱ्यांतच राहावा, अशी भूमिका लोकमतने घेतली होती.
यावर लोकमताचा आदर करुन हा पुतळा होता तेथेच बसविला जाईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली होती. त्यानुसार पूर्वीच्याच जागी चौथरा बसविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते.
या चौथऱ्यावर क्रेनच्या साह्याने शांतिदूत पक्ष्याचा पुतळा बसविण्याचे काम सोमवारी दुपारी बसविण्यात आला. यामुळे सातारकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.