सातारा : वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी कास पठारावर कुंड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:26 PM2018-02-28T13:26:29+5:302018-02-28T13:26:29+5:30

जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर कार्यकारिणी समिती व वनविभाग यांच्याकडून वन्यजीवांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी येथील वीस कुंड्यांमध्ये वेळच्या वेळी पाणी सोडून सोय करण्यात आली आहे.

Satara: Kansya on the Kas plateau to fight the thirst of wildlife! | सातारा : वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी कास पठारावर कुंड्या !

सातारा : वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी कास पठारावर कुंड्या !

googlenewsNext
ठळक मुद्देवन्यजीवांची तहान भागविण्यासाठी कास पठारावर कुंड्या !वेळच्यावेळी पाणी सोडण्यात येते डोंगरमाथ्यावरील झरे आटू लागले

पेट्री : सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असून पठार, डोंगर माथ्यावरील झऱ्यांतील पाणी कमी होत चालले आहे. त्यामुळे जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर कार्यकारिणी समिती व वनविभाग यांच्याकडून वन्यजीवांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सोय करण्यात आली आहे. येथील वीस कुंड्यांमध्ये वेळच्या वेळी पाणी सोडून वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवली जात आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाणारा कास पठार परिसर हिरवीगार दाट झाडी, झुडपांचा असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्राणीसंपदा आहे. यात बिबट्या, रानगवे, अस्वल, साळींदर, ससे, भेकर, माकड, रानडुक्कर, वानर तसेच अनेकविध पशुपक्ष्यांचा समावेश आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वातावरणातील उष्णता वाढत आहे. परिणामी पाण्याअभावी वन्य पशुपक्ष्यांची इतरत्र भ्रमंती न होता व त्यांच्या अधिवासात कोणताही बदल होऊ नये, यासाठी या वन्यजीवांसह पठारावर चरणाऱ्या जनावरांनाही यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होऊ लागली आहे.

सध्या कास परिसरात दिवसभर ऊन जाणवू लागले आहे. तसेच परिसरातील झऱ्यांचे पाणीही कमी होत चालले असून, काही ठिकाणी झरे आटण्याच्या मार्गावर आहेत. पठारापासून राजमार्गाने तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुमुदिनी तलावाचे पाणीही कमी होताना दिसत आहे. यामुळे कार्यकारिणी समिती व वनविभागाकडून तीन वर्षांपूर्वीच ठिकठिकाणी सिमेंटच्या पाण्याच्या कुंड्या पुरण्यात आल्या आहेत.

वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, तसेच त्यांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यामध्ये पाणी सोडले जात आहे. पाणी कमी होत जाईल तसे दर एक-दोन दिवसाला या कुंड्यांमध्ये पाणी भरले जात आहे. त्यामुळे वन्यजीवाची तहान भागत आहे.

Web Title: Satara: Kansya on the Kas plateau to fight the thirst of wildlife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.