सातारा : सातारा शहराचा पारा आणखी घसरला असून आज, मंगळवारी १० अंशांची नोंद झाली. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर थंडीची तीव्रता वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरून येत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे.नवीन वर्ष सुरू झाल्यापासून सातारा शहरातील किमान तापमानात घट येत चालली आहे. १० दिवसांत १५ वरून १० अंशांपर्यंत पारा खाली आला आहे. यामुळे पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी पडत आहे. नागरिकांना हुडहुडी भरू लागली आहे, तर शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. सकाळी १० नंतरच नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. रात्री आठनंतर बाजारपेठेत तुरळक लोक दिसतात. सातारा शहरात मंगळवारी किमान तापमान १० अंश नोंद झाले. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरले. गेल्यावर्षी ५ फेब्रुवारीला सातारा शहराचा पारा ११.०७ अंश नोंद झाला होता.दरम्यान, महाबळेश्वरच्या तापमानात वाढ झाली. सोमवारी किमान तापमान ११.०१ अंशावर होते. मात्र, मंगळवारी १२.०१ अंशांची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वर परिसरात गारठ्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. पर्यटक थंडीचा आनंद लुटत आहेत.
कोयना काठावर थंडीचा कडाका वाढलावाढलेल्या थंडीचा परिणाम पाटण तालुक्याच्या कोयना नदी काठावरच्या गावांना होत असून मोठ्या प्रमाणावर धुके पसरले आहे. तर शेकोट्या पेटवून उबदारपणाचा आस्वाद घेत आहेत. सध्या थंडीची लाट आली आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम कोयना तीरावरील, गावांत जनजीवनावर होत आहे. ऊसतोड कामगार व सकाळी कामावर जाणारे कामगार यांना थंडीचा मोठा त्रास जाणवत आहे. दिवसा मात्र उन्हाचा कडाका यामुळे सर्दी- खोकल्याचे आजार वाढत आहेत.धुक्यामुळे ३२ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणामउत्तर भारतात विशेषत: दिल्ली परिसरात दाट धुके असल्याने रेल्वेसेवांवर विपरीत परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून दिल्लीकडे धावणाऱ्या सुमारे ३२ एक्स्प्रेसचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. अनेक एक्स्प्रेस एक तासांहून अधिक उशिरा धावत आहेत, त्यामध्ये गोवा एक्स्प्रेसचा समावेश आहे.