"म्युझिक लावून गावात फिरायचे, हे छत्रपतींचे विचार आहेत का?"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:32 PM2022-03-09T20:32:37+5:302022-03-09T20:37:51+5:30

Shivendrasinharaje Bhosale And Udayanraje Bhosale : आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा ऊस कुठे न्यायचा, याचं नियोजन करा" अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

Satara Politics Shivendrasinharaje Bhosale Slams Udayanraje Bhosale | "म्युझिक लावून गावात फिरायचे, हे छत्रपतींचे विचार आहेत का?"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

"म्युझिक लावून गावात फिरायचे, हे छत्रपतींचे विचार आहेत का?"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

googlenewsNext

सातारा - "उदयनराजे (Udayanraje Bhosale) कारखान्याचे सभासद नाहीत. त्यांना आमच्या कामावर आरोप करण्याचा अधिकार कोणी दिला? आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा ऊस कुठे न्यायचा, याचं नियोजन करा" अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosale) यांनी केली आहे.

सुरुची बंगलो येथे मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, "नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी यांची निवडणूक जवळ आली की, उदयनराजे अजिंक्यतारा कारखान्यावर आरोप करतात. मात्र कारखाना निवडणूक आली की ती बिनविरोध होते. वय वाढेल तसे बुध्दी भ्रष्ट होऊ लागते. उदयनराजेंना त्यांचे बगलबच्चे खोटी माहिती देतात. आमच्या कारखान्याने कोरोनाच्या काळात कामगारांना एकरकमी पगार दिले. भ्रष्टाचार कशात हे बोलले पाहिजे. सभासद नसतानाही कारखान्याबाबत बोलत आहेत. बोलण्याचा अधिकार सभासदांना आहे. ते सभेत विचारतील. तसेच छत्रपतींच्या विचारांचा मी नाही, हे सांगण्याचा अधिकारही उदयनराजेंना नाही. एवढा तुम्ही विचार जोपासता, तर लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव का झाला? त्याच विधानसभा निवडणुकीत मी निवडून आलो आहे. म्युझिक लावून गावात फिरायचे, हे छत्रपतींचे विचार आहेत का?"

"आपण राज्यसभेचे खासदार आहोत, याचं भान ठेवलं पाहिजे. उदयनराजेंनी वाढदिवसाला डोंबाऱ्याचा खेळ केलाय. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर ३५ लाखांचा भ्रष्टाचार केला. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना वाचविण्यासाठी उदयनराजेंचे प्रयत्न सुरू आहेत. अजिंक्यतारा कारखाना दरवर्षी ८ लाख टन ऊस क्रशिंगसाठी येतो. उदयनराजेंचे कार्यकर्ते आम्हाला ऊस घालत नाहीत. नोंदही करत नाहीत. त्यांचा ऊस उभा असताना, उदयनराजे काय करतात? किती लोकांचा ऊस उदयनराजेंनी घालवला. सहकार मोडीत काढता म्हणता अन् जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर मला बुके देऊन जाता, हे कसं होतं?" असा सवालही शिवेंद्रसिंहराजेंनी विचारला आहे.

सातारा भ्रष्टाचार आघाडी...

सातारा विकास आघाडीचे नाव सातारा भ्रष्टाचार विकास आघाडी ठेवलं पाहिजे. पाच वर्षे पैसे खाण्याशिवाय काही केलं नाही. पोवई नाक्यावरच्या सबवेचा सातारकरांना काही उपयोग होत नाही. लहरीपणा वाऱ्यावरचं काम आहे. काही उपयोग नाही. किती लोक या सबवेचा उपयोग करतात? आहे ते रस्ते मोठे छोटे करून टाकले. नगरपालिकेचा कारभार तर जगजाहीर आहे. कोण टेंटरमध्ये किती खातं हे त्यांचे नगरसेवकच एकमेकांवर आरोप करतात. जंतुनाशक पुरवणारा कोण आहे, याचा लेखाजोखा आमच्याकडे आहे असं म्हटलं आहे. 
 

Web Title: Satara Politics Shivendrasinharaje Bhosale Slams Udayanraje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.