सातारा : जिल्ह्यात ७७ ग्रामपंचायतींसाठी २५ फेब्रुवारीला मतदान, धुमशान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:08 PM2018-02-06T18:08:51+5:302018-02-06T18:10:51+5:30
सातारा जिल्ह्यातील मार्च २०१८ ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. सातारा, जावळी, कोरेगाव, कऱ्हाड, वाई, पाटण, महाळेश्वर, खटाव, माण तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
सातारा : जिल्ह्यातील मार्च २०१८ ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. सातारा, जावळी, कोरेगाव, कऱ्हाड, वाई, पाटण, महाळेश्वर, खटाव, माण तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावांतील गट-तट सामोरे ठाकले आहेत. राष्ट्रवादी व काँगे्रस पक्षांतर्गत गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तसेच भाजप, शिवसेना, मनसे व आरपीआय या पक्षांनीही घुसखोरी करण्याची तयारी सुरू केली आहे.
५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घ्यायला सुरुवात झाली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.