Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live : सातारा जिल्ह्यात महायुतीची मुसंडी, कऱ्हाड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
By दीपक देशमुख | Published: November 23, 2024 10:25 AM2024-11-23T10:25:50+5:302024-11-23T10:27:53+5:30
दिपक देशमुख सातारा : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून आतापर्यंत हाती आलेल्या फेऱ्यांचा निकाल पाहता महायुतीने सातारा जिल्ह्यात ...
दिपक देशमुख
सातारा : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून आतापर्यंत हाती आलेल्या फेऱ्यांचा निकाल पाहता महायुतीनेसातारा जिल्ह्यात मुसंडी मारली आहे. आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी मिळवली आहे.
फलटणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांनी ४५२९ मते मिळवून १९३८ मतांची आघाडी घेतली आहे. आमदार दीपक चव्हाण ४४७७ मते मिळाली आहेत.
Maharashtra Election Results 2024
वाईमध्ये पाचवी फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ यांना २२४१५ मते तर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना३१२०२ मते मिळाली आहे. मकरंद पाटील आघाडी यांनी ७८८७ मतांची आघाडी घेतली आहे.
कोरेगाव मधून पहिली फेरीत महेश शिंदे ( शिवसेना) : ८९५३ तर शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांनी ६१८७ मते मिळवली. महेश शिंदे २७६६ मतांनी आघाडीवर आहेत.
माण मतदार संघात पाचवी फेरी अखेरआमदार जयकुमार गोरे यांना 40993 तर प्रतिस्पर्धी प्रभाकर घार्गे यांना 22416 मते मिळाली. गोरे यांची पाचव्याफेरी अखेर 18577मताची आघाडी मिळाली आहे.
कराड उत्तर मध्येही चौथ्या फेरीअखेर बाळासाहेब पाटील ( राष्ट्रवादी) : 11889 तर मनोज घोरपडे (महायुती) यांना 23599 मते मिळाली असून मनोज घोरपडे 11710 मतांनी आघाडीवर आहे
कऱ्हाड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी दुसऱ्या फेरी अखेर ७४३१ तर पृथ्वीराज चव्हाण यांनी ६३९७ मते मिळवली. अतुल भोसले यांनी १९३४ मतांची आघाडी मिळवली आहे.
पाटण मतदारसंघ तिसरी फेरीअखेर शंभुराज देसाई यांना 3100 तर अपक्ष सत्यजित पाटणकर यांना 2705 मते मिळाली. उद्धव ठाकरे गट हर्षद कदम यांना 301 मते मिळाली असून शंभुराज देसाई 2085 मतांनी आघाडीवर आहेत.
सातारा विधानसभा मतदारसंघ पाचवी फेरी आतापर्यंत 39 हजार 927 मतदान मोजणी झाली. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 31 हजार 185 मते तर विरोधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम यांना 7292 मते. मिळाली आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 32 हजार 635 मताचे लीड मिळाले आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर 61 173 मते मोजून पूर्ण. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 47 853 तर उद्धव सेनेचे अमित कदम यांना १०९५० मते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 36 903 मतांचे लीड.