सातारकरांना मिळणार शुद्ध पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:09+5:302021-06-19T04:26:09+5:30

सातारा : शहापूर पाणीपुरवठा योजनेमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या फ्लॅक्युलेटरची यंत्रणा दुरुस्त करण्यात यश आले आहे. पावसाळ्यामध्ये कितीही गढूळ पाणी ...

Satarkars will get pure water! | सातारकरांना मिळणार शुद्ध पाणी!

सातारकरांना मिळणार शुद्ध पाणी!

Next

सातारा : शहापूर पाणीपुरवठा योजनेमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या फ्लॅक्युलेटरची यंत्रणा दुरुस्त करण्यात यश आले आहे. पावसाळ्यामध्ये कितीही गढूळ पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आले तरी पूर्ण क्षमतेने तुरटीचा वापर करून शहरास शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी दिली.

शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सातारा शहराच्या पूर्व भागासह अन्य भागात सुमारे साडेसात एमएलटी म्हणजेच ६० टक्के पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेमध्ये फिल्टर बेडला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये फ्लॅक्युलेटर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, वर्षभरापूर्वी त्यातील एक पार्ट निकामी झाला होता. गेल्या दीड वर्षांपासून सतत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संबंधित पार्ट उपलब्ध होण्यास अनंत अडचणी येत होत्या. परिणामी या योजनेसाठी अधिकचे मनुष्यबळ लागत होते.

पुणे येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आल्यामुळे तेथील बहुतांश दुकाने खुली करण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पार्ट कोठे उपलब्ध होतो याची माहिती घेऊन तो तत्काळ उपलब्ध करून घेतला. चार दिवसांपूर्वीच शहापूर पाणीपुरवठा योजनेतील फ्लॅक्युलेटरच्या यंत्रातील बिघाड दूर होऊन ती पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे या योजनेत मनुष्यबळ कमी लागण्यास मदत होणार आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच शहापूर पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्राची संपूर्ण स्वच्छता करून तो गाळमुक्त करण्यात आला आहे. तसेच गाळ ढकलणाऱ्या पुलाचे आॅईलिंग, सर्व्हिसिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शुद्धीकरण केंद्रात आवश्यक तेवढी तुरटी टाकण्यात आली असून, त्यामुळे शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा राहिला नाही, असेही सभापती सीता यांनी सांगितले आहे.

फोटो : १८ शहापूर

शहापूर पाणी योजनेची फ्लॅक्युलेटर यंत्रणा पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडून कार्यान्वित करण्यात आली.

Web Title: Satarkars will get pure water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.