तुकाईचीवाडी शाळेचे ८१ वर्षांपासून ज्ञानदान- शाळा स्थापना दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:42 AM2018-03-23T00:42:36+5:302018-03-23T00:42:36+5:30
अंगापूर : तालुक्यातील तुकाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तब्बल ८१ वर्षांपासून ज्ञानदान करत असून, शाळेचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
अंगापूर : तालुक्यातील तुकाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तब्बल ८१ वर्षांपासून ज्ञानदान करत असून, शाळेचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
शाळा स्थापना दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी सरस्वतीच्या प्रतिमेसह गावातून ग्रंथदिंडी काढली. यावेळी त्यांनी पारंपरिक पेहराव केला होता. महाराष्ट्रातील २५ महत्त्वाच्या किल्ल्यांचे पोस्टर्स व त्यांची सखोल माहिती दालनात लावण्यात आली होती.
कलादालनचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्या हस्ते व पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे यांच्या उपस्थितीत झाले. शाळेच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.शाळ व गाव जोडण्यासाठी आणि शिक्षणमित्र ही संकल्पना प्रभाविपणे राबविण्यासाठी महिलांच्या पुढाकाराने महिला व विद्यार्थ्यांसाठी चालविले जाणारे शाळामित्र समन्वय ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. त्यांचे उद्घाटन शाळमित्र प्रकल्पाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते डॉ. माणिक शेडगे याचे हस्ते व ओंकार देशमुख यांचे उपस्थितीत करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी सरपंच संजय पवार, उपसरपंच सुरेश करांडे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष शेखर घार्गे, पोलीस पाटील सुहास काजळे यांनी परिश्रम घेतले.
शेखर घार्गे यांनी सूत्रसंचालन केले. लहू कणसे यांनी प्रस्ताविक केले. मुख्याध्यापक वसंत मोहिते यांनी आभार मानले.
शाळेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून शाळेत साहित्य कलादालन, गड-किल्ल्यांचे पोस्टर प्रदर्शन, शाळामित्र समन्वय ग्रंथालय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाने शाळेच्या व गावच्या सांस्कृतिक वैभवात निश्चितच भर पडली आहे. यासाठी गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य दिले.
- लहू कणसे,
शिक्षक, तुकाईवाडी