कोपर्डे हवेली : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका अधिकारी डॉ. संगीता देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, डॉ. अमित जाधव, सरपंच नेताजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, तलाठी संजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, पोदारचे प्राचार्य अन्वय चिकटे, पोदारचे प्रशासकीय व्यवस्थापक विशाल जाधव, एम. बी. चव्हाण, आर. आर. चव्हाण, महादेव चव्हाण, उत्तम मेंबर, संभाजी चव्हाण, विजय चव्हाण, गणेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विलगीकरण कक्षाची पाहणी करून रुग्णांची विचारपूस केली व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच विलगीकरण कक्षात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. डॉ. रमेश लोखंडे यांनी रुग्णांना आजारांमध्ये घ्यावयाची काळजी व समतोल आहाराविषयी मार्गदर्शन केले.