जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:39 AM2021-01-13T05:39:34+5:302021-01-13T05:39:34+5:30
काळजच्या खून प्रकरणाने जिल्हाभरात उडवली खळबळ लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा गतवर्षी खून, जबरी चोरी, दरोड्याने हादरून गेला. ...
काळजच्या खून प्रकरणाने जिल्हाभरात उडवली खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा गतवर्षी खून, जबरी चोरी, दरोड्याने हादरून गेला. गेल्या वर्षभरात तब्बल ५३ जणांचा खून झाला. हे सर्व गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. मात्र, जबरी चोरीतील गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आले.
जिल्ह्यात गत वर्षभरात विविध प्रकारे गुन्हे घडले. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, सदोष मनुष्यवधाचा समावेश आहे.जबरी चोरीचे ११५ गुन्हे दाखल झाले. त्यांमधील ८३ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. खुनाच्या प्रयत्नाचे ९१ गुन्हे दाखल झाले. त्यांपैकी ९० गुन्हे उघडकीस आले. सदोष मनुष्यवधाचेही १८ गुन्हे दाखल झाले. यामध्ये ११ गुन्हे उघडकीस आले. जिल्हा पोलिसांचे डिटेक्शन अत्यंत चांगले आहे. गुन्हा घडल्यानंतर काही दिवसांतच पोलीस गुन्ह्यांचा छडा लावत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी फलटण तालुक्यातील काळज येथील एका लहान मुलाचा विहिरीत फेकून खून करण्यात आला होता. या घटनेने जिल्हा हादरून गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तत्काळ शोध लावून एका दिवसातच आरोपीला गजाआड केले.
जबरी चोरी करणारे फरारच...
जिल्ह्यात वर्षभरात ११५ जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले. यामध्ये ८३ गुन्हे उघडकीस आले आहेत. यांतील जे गुन्हे उघडकीस आले नाहीत त्यांतील बहुतांश आरोपी परप्रांतीय आहेत. त्यांना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यांत जाण्यासाठी पोलिसांना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांतील ३२ आरोपी अद्यापही फरारच आहेत. या आरोपींना येत्या काही दिवसांत गजाआड केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
गुन्हेगारांची यादी तयार
जे गुन्हेगार मोस्ट वॉटेड आहेत. त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जे गुन्ह्यात हवे आहेत, त्यांना अटक केली जाणार आहे. तसेच ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशांना तडीपार केले जाणार आहे. त्याचा आढावाही सध्या सुरू आहे.
- धीरज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक
वर्षभरात कितीजणांना तडीपार केले...
जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने तडीपारीच्या कारवाया केल्या जातात. वर्षभरात ५३ जणांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच अद्यापही अनेक टोळ्या तडीपारीच्या लक्ष्यावर असून, पोलिसांचे प्रस्ताव तयार आहेत.