‘शहाजीराजे’चा संघ व्हॉलिबॉलमध्ये अजिंक्य
By admin | Published: August 30, 2015 10:04 PM2015-08-30T22:04:44+5:302015-08-30T22:04:44+5:30
दबदबा कायम : सलग दहाव्यांदा पटकावले विभागीय स्पर्धेचे जेतेपद
खटाव : येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत सातारा विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेत सलग दहाव्या वर्षी यजमान शहाजीराजे महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. व्हॉलिबॉल स्पर्धेतील आपला दबदबा क ायम राखणाऱ्या या संघाची विद्यापीठस्तरीय अंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील १५ महावद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. शहाजीराजे महाविद्यालय, तसेच तसेच छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या दोन संघात अंतिम लढत झाली. यामध्ये शहाजीराजे महाविद्यालयाच्या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत २५-२३, २५-२0, २५-१६ अशा सलग तीन सेटमध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजच्या संघावर विजय नोंदवला. स्पर्धेसाठी पंच म्हणून मिलिंद घार्गे, प्रा. राहुल इंगळे, अमित जाधव, विशाल निकम, गजानन ढगे, राजेंद्र पवार, सुनील खरात आदींनी काम पाहिले.
विजयी संघात अनिकेत बरकडे, अनिल कोकाटे, विशाल सजगणे, हृषीकेश बरकडे, धीरज शेलार, अक्षय सजगणे, अभिजित वाघ, सोहम चव्हाण, शंतनू माने, विश्वजित सजगणे, रोहित गुरव, विपुल लावंड यांचा सहभाग होता.
या संघाला प्रशिक्षक म्हणून जावेद मनोरे, प्रा. बंडा गोडसे, प्रा. दिलीप बरकडे यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या संघांची सातारा जिल्ह्यातून निवड झाली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या शहाजीराजे महाविद्यालयासह द्वितीय पारितोषिकप्राप्त छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव या महाविद्यालयांचा समावेश आहे. दि. १२, १३ व १४ सप्टेंबर रोजी राजारामबापू पॉलिटेक्निक साखराळे, इस्लामपूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी या संघांची निवड झाल्याचे जिमखाना विभागप्रमुख प्रा. दिलीप बरकडे यांनी सांगितले.