पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, साताऱ्यात १९ फेब्रुवारीला वितरण
By सचिन काकडे | Published: January 31, 2024 03:23 PM2024-01-31T15:23:56+5:302024-01-31T15:24:52+5:30
साताऱ्यात दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
सातारा : शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला 'शिवसन्मान पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
पुरस्कार वितरणाचा सोहळा साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे. या जागेची बुधवारी दुपारी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पाहणी करून कार्यक्रमाची तयारी, त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, सुरक्षा आदी बाबींचा आढावा घेतला.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही केल्या. यावेळी सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, विनीत पाटील आदी उपस्थित होते.