सातारा : शाहूपुरी येथील राहत्या घराला रंग देताना शिवाजी जिजाबा करपे (वय ६०, आझादनगर, शाहूपुरी, सातारा) हा शॉक लागून जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरी येथील आझादनगरमध्ये राहणारे शिवाजी जिजाबा करपे हे आपल्या घराला दुपारी साडेचार वाजता आतून रंग देत होते. यावेळी रंग देताना हातातील ओला ब्रश हा इलेक्ट्रीक वायरला लागला. त्यामुळे त्यांना जोराचा विजेचा शॉक बसला. त्यांच्या हाताला व पोटाला भाजले त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये ते ५० टक्के भाजले आहेत.
वणवा विझवताना एक जखमी सातारा : येथील मंगळवार पेठेतील बोगदा परिसरात राहत्या घराजवळ वणवा पेटल्याने तो विझवताना सचिन रामचंद्र जांगळे(वय १८,) हा भाजून जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोगदा परिसरामध्ये अज्ञाताने वणवा पेटविला. हा वणवा विझविण्यासाठी सचिन पुढे सरसावला. त्याच्या घरापर्यंत त पेटत आला. यामध्ये आपले घर पेटू नये म्हणून सचिन जांगळे या तरुणाने हा वणवा विझवण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्याचे दोन्ही हात व पायांचे पंजे भाजून तो जखमी झाला. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
‘ड्राय डे’ला दारु अड्ड्यावर छापा
सातारा : शासनाने रविवारी ड्राय डे घोषित केला होता. असे असतानाही येथील सातारा चिकन सेंटरच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला बेकायदा दारु विक्री चालू होती. या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सुनिल लक्ष्मण पाटोळे (वय ३६, रा. कोंडवे, ता. सातारा), शुभम राजू कांबळे (रा. राधिकारोड सातारा), राजू जगप्पा कांबळे (रा. राधिकारोड सातारा) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी सुनिल पाटोळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून देशी दारूच्या २७ बाटल्या जप्त करण्यात आल्या.