म्हसवड : येथील सिद्धनाथाच्या रिंगावण यात्रेला एकादशीपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. म्हसवडनगरी यात्रेसाठी सज्ज झाली असून ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलंऽऽऽ’च्या गजरात ढोलाच्या निनादात गुलाल, खोबºयाच्या उधळणीत शेकडो मानकऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी रथोत्सव पार पडणार आहे.दीपावली पाडव्यादिवशी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरींना हळदी लावून सुरू झालेल्या लग्न सोहळ्याची सांगता बुधवारी श्रींच्या विवाहाची वरात म्हणजेच रथोत्सव यात्रेने होत असते. याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीदिवशी रिंगावण मैदानावर असलेल्या रथगृहातून श्रींचा रथ मानकºयाच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला. यावेळी रथाचे मानकरी माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, प्रतापसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, तेजसिंह राजेमाने, जयसिंह राजेमाने या प्रमुख मान्यवरांसह सिद्धनाथ मंदिराचे सालकरी सुनील कीर्तने, मठाधिपती रविनाथ महाराज, नगराध्यक्ष तुषार वीरकर, युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, राजेमाने घराण्यातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हा रथ रथगृहातून बाहेर काढण्यात आला.अजितराव राजेमाने म्हणाले, ‘ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचा रथोत्सवाची यात्रा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी गावकºयांची असून, रथ ओढण्याचा मान माळी समाजाचा आहे.यंदा नदीपात्रात पाणी असल्याने रथमार्ग बदलून बायपास रोडने रथ बसस्थानक चौकात नेण्यात येणार आहे. वडजाई ओढ्याचे काम सुरू असल्याने रथ नव्याने बांधलेल्या पुलावरून जोतिबा मंदिरानजीक थांबवून या ठिकाणी नवसाची मुले रथावरून टाकण्याची प्रथा होणार आहे.’
सिद्धनाथाच्या रिंगावण यात्रेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 1:02 AM