रहिमतपुरात कडक निर्बंधामुळे सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:39 AM2021-04-07T04:39:59+5:302021-04-07T04:39:59+5:30
रहिमतपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहिमतपुरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांना टाळे लावण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सन्नाटा पसरला आहे. ...
रहिमतपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहिमतपुरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांना टाळे लावण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सन्नाटा पसरला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. सोमवारी रात्री साडेनऊपर्यंत जिल्ह्यात एका दिवसात ७५८ बाधित सापडले असून, सहाजणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित म्हणून उपचार घेताना रहिमतपूर येथील ७७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. रहिमतपूरसह परिसरातील गावांमध्येही कमी-जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक बाधितांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील घराशेजारील लोकांमध्ये भीती पसरली आहे. ही विदारक परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये व कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या पार्श्र्वभूमीवर रहिमतपूर येथील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांनी दुकाने बंद केली आहेत. त्यामुळे बाजारपेठेसह शहरात शुकशुकाट पसरला आहे.