गोंदवले खुर्द सरपंचपदी सिंधुताई गाढवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:54 AM2021-02-26T04:54:05+5:302021-02-26T04:54:05+5:30
म्हसवड : गोंदवले खुर्द, ता. माण येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सिंधुताई गाढवे आणि उपसरपंचपदी अमोल पोळ यांची बिनविरोध निवड ...
म्हसवड : गोंदवले खुर्द, ता. माण येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सिंधुताई गाढवे आणि उपसरपंचपदी अमोल पोळ यांची बिनविरोध निवड झाली.
गोंदवले खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत गोपाळ कृष्ण ग्रामविकास पॅनेल आणि गोपाळ कृष्ण परिवर्तन पॅनेलमध्ये लढत झाली होती. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या नऊ असून, यापैकी दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर ७ जागांसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे अमोल पोळ, सिंधुताई गाढवे, सुरेखा पोळ या चार जागा निवडून आल्या आणि एक बिनविरोध व आमदार गोरे गटाचे विजय अवघडे, रूपाली शिलवंत, सोनाली अवघडे या तीन जागा निवडून येत साहेबराव शेडगे हे बिनविरोध आले होते. संख्यीय बलाबल राष्ट्रवादी पाच आणि जयकुमार गोरे गट चार असे झाले होते. त्यात सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असे आरक्षण पडले होते.
मंगळवार, दि. २३ रोजी सरपंच पदासाठी सिंधुताई गाढवे यांनी, तर उपसरपंच पदासाठी अमोल पोळ यांनी अध्यासी अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज दाखल केले. यानंतर इतर कोणीही या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल न केल्याने सरपंच आणि उपसरपंच निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले.
यावेळी ग्रामसेवक शरद जाधव उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, संदीप पोळ, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ, माजी सरपंच अर्जुनराव शेडगे, चेअरमन सुनील पोळ, कैलास पोळ, दीपक पोळ, रावसाहेब पोळ, सुनील कदम, बाळासाहेब माने, संभाजी पोळ, संतोष पोळ, दत्ता पोळ तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले.
२५गोंदवले
फोटो -
गोंदवले, खुर्द, ता. माण येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी जल्लोष केला.