शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

भररस्त्यात थेट पोलिसांना धक्काबुक्की!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2015 8:16 PM

वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यासोबत हुज्जत : साताऱ्यात कायद्याचा धाक राहिलाय का ?-न्यूज लेन्स...

साई सावंत -सातारा  =-पूर्वी पोलिसाच्या वेशात बहुरूपी जरी गावात आला तरी धडकी भरायची. कळती मुलंही रडकुंडीला यायची, तर ज्येष्ठमंडळीही त्या नकली ‘वर्दीवाल्या’शी अदबीनं वागायची. आता जमाना बदललाय. कायद्याचा अन् खाकीचाही धाक कुणाला राहिला नाही. एककीडं आॅन ड्युटी असणाऱ्या पोलिसांना मारहाण होते तर दुसरीकडं पोलिसांकडूनही खाकीचा हिसका दाखविला जातो. ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या सातारा शहरातील काही घटनांवरून असेच काहीसे चित्र पाहायवयास मिळाले.स्थळ - बॉम्बे रेस्टॉरंट चौक. उड्डाणपुलाखाली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सेवेत तैनात होते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर त्यांची करडी नजर होती. अशातच एका वाहतूक पोलिसाची नजर एका दुचाकीवर स्थिरावली. नंबरप्लेटवरून ती गाडी सातारा जिल्ह्यातील नसल्याचे त्यांनी हेरले अन् पुढे होऊन त्यांनी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला. पुण्याच्या दिशेने निघालेल्या त्या दुचाकीस्वाराने गाडी थांबविली. दुचाकीवर पाठीमागे एक महिला होती. पोलीसदादाने दुचाकीस्वाराकडे लायसन मागितले. त्यानेही ते दाखविले. त्यानंतर पोलिसाने गाडीच्या कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. त्यावर ‘कागदपत्रे गाडीत नाहीत. असे सांगितले. पोलिसाने गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताना दुचाकी रस्त्यावर पडली अन् दोघांमध्ये झटापट झाली.वाक्युद्धानंतर झटापट...गाडीची कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी गाडीची चावी काढून घेताना दुचाकीस्वाराचा तोल जाऊन गाडी पडली. पाठीवरील सॅकही फेकली गेली. त्यामुळे तो संतापला. रागाने अंगावर जाऊन ‘मी कोण आहे, तुला दाखवतो, असे म्हणत त्याने पोलीसदादाशी हुज्जत घातली. या प्रकारानंतर पोलीसदादानंही ‘चल, तुला दाखवतो मी कोण आहे,’ असे म्हणत त्याची बखोटी पकडली. त्यानंतर दुचाकीचालकानंही बोट दाखवून दम भरला. दोघांमधील वाक्युद्ध अन् झटापट पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती.महिलेनं दिला धक्का !दुचाकीचालक अन् पोलिसांमध्ये वाक्युद्ध सुरू असताना दुचाकीस्वाराबरोबर असलेल्या महिलेने पोलिसाच्या खांद्याला धक्का देऊन त्यांना मागे सारण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं काम आहे, जाऊ द्या आम्हाला..परवाना दाखविल्यानंतर पोलिसांनी गाडीची कागदपत्रे दाखविण्याची मागणी केली. मात्र, ‘आता माझ्याकडे कागदपत्रे नाहीत. पुण्याला महत्त्वाच्या कामासाठी निघालोय, जाऊ द्या आम्हाला, असे दुचाकीस्वार सांगू लागला होता. मात्र, सुरुवातीला अरेरावीची भाषा वापरल्यामुळे पोलीसदादाचा पारा चढला होता.दुचाकीसाठी दाखविला चारचाकीचा परवानाकाही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका महिला दुचाकीस्वाराला अडवून त्यांच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवाना मागितला. त्यावर त्या महिलेने पोलिसाच्या हाती चक्क चारचाकी चालविण्याचा परवाना ठेवला. पोलिसांनी दुचाकीचा परवाना मागितला. त्यावर ती महिला म्हणाली, ‘अहो साहेब, जर मी चारचाकी वाहन चालवू शकते तर दुचाकी नाही का चालवू शकत?’ महिलेचे हे अजब उत्तर ऐकून पोलीसदादाची बोलती बंद झाली.मी चावी देणार नाय...आज (सोमवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास कुंभारवाड्यासमोर ट्रीपलसीट निघालेल्या दुचाकीला पोलिसांनी पकडले. तिघेही विद्यार्थी होते. पोलीसदादाने त्यांच्याकडे लायसन मागितले आणि गाडीची चावी काढून घेणार तोच एका मुलाने गडबडीने चावी काढून घेतली. त्यानंतर पोलीसदादाने त्या मुलाकडे चावी मागताच ‘मी चावी देणार नाय,’ असे उद्धटपणे बोलून तिघांनी धूम ठोकली. त्यानंतर हवालदाराने शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने विनाचावीची ती गाडी वाहतूक शाखेत नेली.नागरिकांमुळं झाली सुटकाभररस्त्यात सुरू असलेला प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. इतर वाहतूक पोलीसही तिथे आले. नागरिकांनी समजावल्यानंतर शंभर रुपयांचा दंड करून पोलिसांनी त्याला सोडून दिले.