खटाव : मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात करत शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरली आहे.
मागील आठवड्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी बी-बियाण्याची जमवाजमव करून जमिनीला वाफसा येताच पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेळेची बचत व कमी मनुष्यबळ यावर आधारित सुधारित शेती करण्याकडे बहुतांश शेतकरी वळले असल्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीची कामे करण्याची लगबग शेतकरी करत आहे.
नगदी पीक म्हणून घेवड्याच्या पिकाला खरिपाच्या पिकात अधिक प्राधान्यक्रम आहे तर त्याच्या जोडीला सोयाबीन तसेच मूग, मटकी, चवळीसारख्या कडधान्यदेखील घेत आहे.
मृग नक्षत्रात पेरणीसाठी उपयुक्त पाऊस झाल्यामुळे आद्रा नक्षत्रात पेरणी उरकण्याची सर्वच शेतकऱ्यांची घाई सुरू झाली आहे. शेतीत अनेक संकटांचा फेरा सुरूच असतो. त्यातच कोरोनाचे संकट आले असले तरी देखील खचून न जाता त्या संकटावर मात करून पुन्हा नव्या जोमाने खरिपाच्या पेरणीसाठी बळिराजा सज्ज झाला आहे.
२४खटाव
कॅप्शन : खटाव तालुक्यात खरिपाच्या पेरणीमध्ये शेतकरीराजा व्यस्त झाला आहे.