स्ट्रॉबेरीच्या गोडीला मिळाली साहित्याची जोड : भिलारला नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:27 PM2017-12-05T22:27:45+5:302017-12-05T23:01:00+5:30

सातारा : ‘स्ट्रॉबेरीचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची आता ‘साहित्याचे गाव’ म्हणून नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे

Strawberry's sweethearted material: A new introduction to Bhilar | स्ट्रॉबेरीच्या गोडीला मिळाली साहित्याची जोड : भिलारला नवी ओळख

स्ट्रॉबेरीच्या गोडीला मिळाली साहित्याची जोड : भिलारला नवी ओळख

googlenewsNext
ठळक मुद्देवाचन संस्कृती वाढविणाºया उपक्रमाचे देशभरातील पर्यटकांकडून कौतुकप्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले

सातारा : ‘स्ट्रॉबेरीचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची आता ‘साहित्याचे गाव’ म्हणून नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे. देश व जगभरातील पर्यटक नेहमीच महाबळेश्वर व भिलार या गावांना भेटी देतात. या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून राज्य शासनाने या वर्षी भिलार गावाला ‘पुस्तकाचं गाव’ म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खूप गडद झाली असून, हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत.

भिलार गावात मेपासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोखं ‘पुस्तकाचं गाव’ साकारण्यात आलं. आज या पुस्तकाच्या गावामध्ये २५ घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकारांची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन संस्कृती वाढावी, पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास या साहित्य प्रकारांची घरात दालन उभी केली आहेत.

केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. येणाºया प्रत्येक पर्यटकाला त्याच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास पंधरा हजार मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहे. भिलारला स्ट्रॉबेरीची गोडी चाखण्यासाठी येणाºया प्रत्येक पर्यटकाला आता साहित्याची गोडीही लागत असून, या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे.

घरावरील चित्रे देतायत साहित्याची प्रचिती
निवडलेल्या पंचवीस घरांवर विविध प्रकारची चित्रं रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड:मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरून पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते.

काय आहे पुस्तकांच्या गावात?
२५ घरांत १५ हजार पुस्तकांचा खजिना
पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध
चित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणी
गावात कथाकथन अन् कविता वाचनाचे आयोजन
पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक
अंधांसाठी ई-बुकची उपलब्धता
 

शासनाने हा राबविलेला उपक्रम छान आहे. येथे वेगवेगळे पुस्तके वाचून मला आनंद मिळत आहे. या गावामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपºयातून पर्यटक येत आहेत, मी शासनाची आभारी आहे.
- हेमलता वाघ,
पर्यटक, इंदोर, मध्य प्रदेश

माझ्या घरामध्ये कथा साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत तसेच माझ्या घरालाही दरवाजा नाही. पुस्तक वाचण्यासाठी माझे घर पर्यटकांसाठी चोवीस तास खुले केले आहे.
- प्रवीण भिलारे, ग्रामस्थ

Web Title: Strawberry's sweethearted material: A new introduction to Bhilar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.