सातारा पालिका शाळांचे विद्यार्थी अनेक वर्षांनंतर मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:35 AM2017-12-14T00:35:55+5:302017-12-14T00:37:48+5:30
सातारा : गुरुवार परजावरील पालिका शाळांच्या आवारात उभ्या केल्या जाणाºया चालू व बंद स्थितीतील गाड्या बुधवारी संबंधित वाहन मालकांकडून स्वत:हून हटविण्यात आल्या
सातारा : गुरुवार परजावरील पालिका शाळांच्या आवारात उभ्या केल्या जाणाºया चालू व बंद स्थितीतील गाड्या बुधवारी संबंधित वाहन मालकांकडून स्वत:हून हटविण्यात आल्या. वाहनांच्या विळख्यात अडकलेल्या या शाळांनी मोकळा श्वास घेतला असून विद्यार्थी अनेक वर्षांनंतर खेळण्यासाठी मैदानात आले.
गुरुवार परजावर पालिकेची उर्दू शाळा क्रमांक १३ व मराठी माध्यमाची एकता विद्या निकेतन अशा दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांमध्ये सुमारे २५० विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच अनेक नादुरुस्त गाड्या लावल्या जात होत्या. तसेच खरेदीसाठी येणारे वाहनधारकही शाळेच्या आवारातच वाहने पार्क करीत असल्याने शाळेचे प्रवेशद्वार वाहनांनी बंदिस्त झाले होते. त्यामुळे शाळेत पाल्याला सोडण्यासाठी येणाºया महिलांना गाड्यांमधून वाट काढतच शाळेत जावे लागते. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत महिलांना ही समस्या नेहमीच भेडसावत होती.
या समस्येबाबत ‘लोकमत’ने ‘पालिका शाळांचा परिसर.. भंगार गाड्यांचे वाहनतळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित वाहन मालकांनी बुधवारी आपली वाहने स्वत:हून काढली. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुरव्याचे पालकांमधून कौतुुक होत आहे. वाहन मालकांनी मुलांच्या भवितव्याचा विचार करून यापुढेही वाहने शाळेजवळ वाहने उभी करू नये, अशी मागणी होत आहे.
चिमुकल्यांच्या चेहºयावर फुलले हास्य
शाळेचा परिसर गाड्यांचे वाहनतळ बनल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच उरले नव्हते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर खेळण्यासाठी सोडले जात नव्हते.
सर्व गाड्या हटविण्यात आलेल्याने पालिकेच्या दोन्ही शाळांना मोकळा श्वास घेतला. त्यामुळे सुटीच्या वेळेत अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर येऊन खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.