कऱ्हाड : कऱ्हाड अर्बन बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाषराव जोशी यांची निवड करण्यात आली. सुभाषराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळामध्ये आणखी सात सदस्य काम पाहणार असून, यामुळे बँकेच्या कामकाजात आणखी सुधारणा व पारदर्शकता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बदलत्या धोरणानुसार व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यात आले आहे.
व्यवस्थापन मंडळाची स्थापना करणारी कऱ्हाड अर्बन ही पश्चिम महाराष्ट्रात अग्रणी बँक ठरली आहे. बँकेच्या इतिहासात १९३८ मध्ये संचालक मंडळास विविध साहाय्यभूत सल्ले देण्यासाठी अनुभवी संचालकांचे व्यवस्थापन मंडळ स्थापन केले गेले होते. आणि रिझर्व्ह बँकेने सध्याच्या स्थितीत अशाच प्रकारचा निर्णय घेत व्यवस्थापन मंडळ स्थापनेच्या सूचना दिलेल्या आहेत. हा एक उत्तम योगायोग आहे. कऱ्हाड अर्बन बँकेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये सुभाषराव जोशी यांच्यासोबत डॉ. सुभाष एरम तसेच डॉ. अनिल लाहोटी यांची बँकिंंग व सहकार क्षेत्रातून, सीए स्वानंद पाठक यांची अकौटंसी क्षेत्रातून, सागर जोशी यांची लघुउद्योग व कृषी क्षेत्रातून, शशांक पालकर व सागर शिराळकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकरी दिलीप गुरव अशा संबंधित क्षेत्रात विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष व सर्व सदस्यांचा बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ संचालक विद्याधर गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी बँकेचे संचालक आनंद पालकर, महाव्यवस्थापक सलीम शेख, जितेंद्र कंटक, गिरीश सिंंहासने, महेश वेल्हाळ व प्रशासन विभागाचे उपमहाव्यवस्थापक दीपक आफळे उपस्थित होते.
फोटो : ०७केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड अर्बन बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचा सत्कार ज्येष्ठ संचालक विद्याधर गोखले यांच्या हस्ते करण्यात आला.