क्रॉसकंट्री स्पर्धेत मांढरदेवच्या खेळाडूंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:54 AM2021-02-26T04:54:02+5:302021-02-26T04:54:02+5:30
वाई : राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत मांढरदेवच्या खेळाडूंनी यश संपादन केले. यामध्ये सुशांत जेधे याने वीस वर्षांखालील मुलांच्या गटात वैयक्तिक ...
वाई : राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत मांढरदेवच्या खेळाडूंनी यश संपादन केले. यामध्ये सुशांत जेधे याने वीस वर्षांखालील मुलांच्या गटात वैयक्तिक रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्या वीस वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात सुशांत जेधे व बाळू पुकळे, तर मुलींच्या संघात आकांक्षा शेलार व विशाखा साळुंखे यांचा समावेश होता
चंदीगड येथे राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धा झाली. यामध्ये २० वर्षांखालील मुलांच्या आठ किलोमीटर धावणे स्पर्धेत सुशांत जेधेने दुसरा क्रमांक, तर बाळू पुकळेने सहावा क्रमांक मिळवला. मुलींच्या सहा किलोमीटर धावणे स्पर्धेत आकांक्षा शेलारने सहावा, तर विशाखा साळुंखेने आठवा क्रमांक मिळवला. यामुळे महाराष्ट्रच्या २० वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाने सांघिक सुवर्णपदक मिळवले.
सुशांत जेधे, आकांक्षा शेलार व विशाखा साळुंखे हे वाई येथील किसन वीर महाविद्यालयात, तर बाळू पुकळे हा खेळाडू कऱ्हाडच्या वेणुताई चव्हाण कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. हे खेळाडू मांढरदेव येथे निवासी राहून प्रशिक्षण घेत आहेत. यशाबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, पांडुरंग शिंदे, विनायक नाईक, दीपक ओसवाल यांनी कौतुक केले आहे.