शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

परंपरा टिकविणे, खंडित करण्यात चढाओढ!

By admin | Published: October 09, 2014 9:31 PM

माणमध्ये हातघाईची लढाई...

नितीन काळेल -- सातारा --जिल्ह्यातील आठही मतदारसंघात जवळपास पंचरंगी लढत होत असली तरी खऱ्या अर्थाने सामना रंगणार आहे तो काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच. उमेदवारांनी विजयासाठी आटापिटा सुरू केला असून यामध्ये विद्यमान सात आमदारांना पुन्हा विजयाचा ‘मान’ मिळणार का, हाच महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. अनेक मतदारसंघात एकच उमेदवार मागील काही वर्षांपासून निवडून येत आहे. काही ठिकाणी आलटून-पालटून आमदारकी मिळत आहे. मतदारसंघाची ही जय-पराजयाची परंपरा टिकविण्यासाठी आणि खंडित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. कऱ्हाड दक्षिण आणि फलटण मतदारसंघात एकाच पक्षाकडे (व्यक्ती) अनेक वर्षांपासून सत्ता आहे. सातारा आणि कऱ्हाड उत्तरमध्येही मागील काही वर्षांपासून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि बाळासाहेब पाटील सत्ता गाजवत आहेत. आघाडी आणि महायुती तुटल्यामुळे सर्वत्र बहुरंगी लढती झाल्या. भाजपने मित्रपक्ष आपल्याकडे वळवले आणि ‘मनसे’ही रिंगणात उतरली. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत आहे. कऱ्हाड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून रिंगणात आहेत. विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत. ते येथून सात वेळा निवडून आले आहेत. भाजपचे डॉ. अतुल भोसले मागील वेळी कऱ्हाड उत्तरमधून राष्ट्रवादीतर्फे उभे होते. तेथे घड्याळ्याची टिकटिक वाढलीच नाही आणि त्यांना परभाव पत्करावा लागला. आता ते दक्षिणेतून रिंगणात आहेत. शिवसेनेचे अजिंक्य पाटील तर ‘मनसे’चे अ‍ॅड. विकास पवारही आहेत. उंडाळकरांना विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. त्यांच्यापुढेही काँग्रेसचे धैर्यशील कदम आणि ‘स्वाभिमानी’चे मनोज घोरपडे यांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. बाळासाहेब सलग तीन वेळा निवडून आले असून विजयाची परंपरा त्यांना टिकवावी लागणार आहे. इतर पक्षांचे उमेदवार ही परंपरा खंडित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाटणमध्ये आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना रिंगणात उतरविले आहे. येथे शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्याशी त्यांचा सामना आहे. काँग्रेसकडून हिंदुराव पाटील आहेत. हजार मतांच्या आत-बाहेर विजय किंवा पराभव ठरविणारी ही निवडणूक आता आणखी रंगतदार झाली आहे. राष्ट्रवादीला दुसऱ्यांदा विजय मिळाला तरच येथे परंपरा निर्माण होऊ शकते. सातारा-जावलीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यापूर्वी अभयसिंहराजे भोसले हे सलग अनेक वेळा निवडून आले आहेत. यंदा शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात भाजप व शिवसेनेने तगडे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे विजयाची पंरपरा टिकविण्यासाठी संघर्ष आहेच. सेनेकडून माजी आमदार दगडूदादा सकपाळ रिंगणात आहेत. काँग्रेसच्या रजनी पवार, भाजपचे दीपक पवारही जोरदार प्रचार करीत आहेत. वाईत सलग चार वेळा मदनराव पिसाळ निवडून आले होते. २००४ च्या निवडणुकीत मदन भोसले निवडून आले. त्यांनी मकरंद पाटील यांचा पराभव केला होता. २००९ ला मात्र मदन भोसले यांचा मकरंद पाटील यांनी पराभव केला. यंदा दोघेही रिंगणात असून सेनेकडून डी.एम. बावळेकर व भाजपकडून पुरूषोत्तम जाधव रिंगणात आहेत. सर्वच उमेदवार तगडे असल्याने परंपरा जपण्या-मोडण्याचा संघर्ष येथेही आहेच. फलटणला १९९५ पासून सबकुछ रामराजे नाईक-निंबाळकर अशी परिस्थिती आहे. २००९ ला मतदारसंघ राखीव झाल्याने रामराजे यांनी दीपक चव्हाण यांना मैदानात उतरवून विजयी केले. आताही राष्ट्रवादीकडून चव्हाण हेच उमेदवार आहेत. काँग्रेसकडून दिंगबर आगवणे, सेनेकडून डॉ. नंदकुमार तासगावकर, ‘स्वाभिमानी’कडून पोपटराव काकडे रिंगणात आहे. आमदार चव्हाण यांच्यावर विजयाचा गुलाल पडण्यासाठी रामराजे यांनी अनेक व्यूहरचना केल्याचे दिसत आहे. वीस वर्षांची परंपरा टिकविण्यासाठी रामराजे यांनाही संघर्ष करावाच लागणार आहे. कोरेगावात मागील निवडणुकीत जावळीतून जाऊन शशिकांत शिंदे यांनी विजयी सलामी ठोकली. त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी शालिनीताई दोन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. आता शिंदे यांनाही सलग विजयाची परंपरा टिकवावी लागणार आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अ‍ॅड. विजयराव कणसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, सेनेचे हणमंत चवरे तर ‘स्वाभिमानी’कडून संजय भगत रिंगणात आहेत. माणमध्ये हातघाईची लढाई...माण विधानसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर अनेकांनी आमदार होण्यासाठी देव पाण्यात घातले पण पहिल्याच प्रयत्नात जयकुमार गोरे यांनी बाजी मारली. येथील इतिहास पाहता मागील दोनवेळचा अपवाद वगळता येथील विद्यमान आमदार दोन ते तीनवेळा निवडून आला आहे. त्यामुळे आमदार गोरे ही खंडीत परंपरा मोडीत काढून माणचा ‘मान’ पुन्हा मिळविणार का याकडे लक्ष लागले आहे. येथे माजी आमदार सदाशिवराव पोळ, ‘रासप’चे शेखर गोरे, अपक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख आणि ‘मनसे’चे धैर्यशील पाटील यांनी विजयासाठी जोरदार प्रचार मोहीम राबविली आहे. माणमध्ये हातघाईची लढाई... माण विधानसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर अनेकांनी आमदार होण्यासाठी देव पाण्यात घातले पण पहिल्याच प्रयत्नात जयकुमार गोरे यांनी बाजी मारली. येथील इतिहास पाहता मागील दोनवेळचा अपवाद वगळता येथील विद्यमान आमदार दोन ते तीनवेळा निवडून आला आहे. त्यामुळे आमदार गोरे ही खंडीत परंपरा मोडीत काढून माणचा ‘मान’ पुन्हा मिळविणार का याकडे लक्ष लागले आहे. येथे माजी आमदार सदाशिवराव पोळ, ‘रासप’चे शेखर गोरे, अपक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख आणि ‘मनसे’चे धैर्यशील पाटील यांनी विजयासाठी जोरदार प्रचार मोहीम राबविली आहे.