‘स्वाइन फ्लू’च्या साथीत डॉक्टर संपर्काबाहेर

By admin | Published: August 30, 2015 10:29 PM2015-08-30T22:29:46+5:302015-08-30T22:29:46+5:30

आरोग्य विभाग सुस्त : फलटण तालुक्यातील एका महिलेच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

With swine flu, the doctor is out of contact | ‘स्वाइन फ्लू’च्या साथीत डॉक्टर संपर्काबाहेर

‘स्वाइन फ्लू’च्या साथीत डॉक्टर संपर्काबाहेर

Next

फलटण : फलटणमध्ये ‘स्वाइन फ्लू’ने एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’ हात-पाय पसरवत असल्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने जिल्ह्यात दौरा करत आहेत. मात्र, फलटणमधील प्रशासन सुस्त असल्याचे जाणवत आहे. येथील वैद्यकीय अधिकारीच संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने भीतीत भर पडत आहे.फलटण तालुक्यात मागील चार-पाच वर्षांमध्ये ‘स्वाइन फ्लू’ने अनेकजण मृत्युमुखी पडल्याचे व अनेकांना याची लागण झाल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. ‘स्वाइन फ्लू’प्रमाणेच डेंग्यूनेही मृत पावल्याचा आकडा भला मोठा आहे. दरवर्षी या साथीचे आजार पसरत असताना याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग व नगरपालिका कमी पडत आहे. फलटण शहरात हॉस्पिटलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी या साथी येत असताना याबबत उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग व नगरपालिका कमी पडत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ‘स्वाइन फ्लू किंवा डेंग्यू’बाधीत रुग्ण दाखल झाल्यास याची माहिती तातडीने उपजिल्हा रुग्णालयात देणे गरजेचे आहे. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात कुसूर होत आहे. आरोग्य यंत्रणात खासगी डॉक्टरांशी संपर्क ठेवण्यात कमी पडताना दिसून येत आहे. काहीवेळेस उपजिल्हा रुग्णालयात ही ‘स्वाइन फ्लू’ किंवा ससूनला जाण्याचा मौलिक सल्ला देऊन जबाबदारी झटकण्याचे प्रकार घडत आहे. सर्वात याबाबतीतला कळस म्हणजे याबाबतची माहिती लपवून ठेवली जात आहे, असा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.सतत येणारा स्वाइन फ्लू व डेंग्यूबाबत सातत्याने जनतेशी संपर्क ठेवून या साथीबाबतच्या उपाययोजनांची माहिती देणे गरजेचे असताना ते होत नाही. शहरात मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण होत चालला आहे. कचराकुंड्या फुल्ल असण्याबरोबरच सार्वजनिक स्वच्छतागृहे, अस्वच्छ परिसर निर्माण झाला आहे. मोकळ्या प्लॉटमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
याबाबत नगरपालिका दक्ष असल्याचे दिसून येत नाही. स्वाइन फ्लू व डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर शहरात कोठेच काही अद्याप उपाययोजना सुरू असल्याचे दिसत नाही. प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाइल नॉट रिचेबल लागत आहेत.
स्वाइन फ्लू व डेंग्यूची लक्षणे आढळल्याने कोणी रुग्ण आढळले का? याची विचारणा केली असता रुणालयातून ‘नाही’ असे उत्तर दिले जात आहे. माहिती लपविण्यामागची कारणे समजेनाशी झाली आहेत. एखाद्याचा मृत्यू झाला तरच, हे झोपेतून उठून उपाययोजना करणार का? असा प्रश्न जनतेतून यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दौरे सुरू केले आहेत. त्यांनी फलटण तालुक्यातही लक्ष आरोग्य यंत्रणा सतर्क करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)


‘स्वाईन फ्लू’ च्या पार्श्वभूमीवर सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्दी- खोकल्याचे जरी रूग्ण आले तरी त्यांच्यावर गांभिर्याने उपचार केले जात आहेत. ‘स्वाईन फ्लू’ आजार टाळण्यासंदर्भात जनजागृती करून सर्वत्र माहिती दिली जात आहे.
-डॉ. किरण राऊत,
वैद्यकीय अधिकारी

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ माजून भीतीचे वातावरण पसरले आहे. ‘स्वाइन फ्लू’ची भीती नागरिकांच्या मनातून जात नसल्याने शहरात पालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी वाढू लागली आहे.

Web Title: With swine flu, the doctor is out of contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.