‘त्या’अंगणवाडी सेविकांवर कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:17 AM2021-05-04T04:17:58+5:302021-05-04T04:17:58+5:30
निवेदनात म्हटले आहे की, सरकारची कोविड किट नावाची योजना आहे. त्यामध्ये तुम्ही चाळीस रुपये रोख भरून सहभागी होऊ शकता. ...
निवेदनात म्हटले आहे की, सरकारची कोविड किट नावाची योजना आहे. त्यामध्ये तुम्ही चाळीस रुपये रोख भरून सहभागी होऊ शकता. सोबत तुम्हाला रेशनिंग कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स जोडावी लागणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थीला तीन महिने मोफत धान्य व दहा हजार रुपये रोख परतावा मिळणार आहे, अशी माहिती अंगणवाडी सेविकांकडून सांगण्यात आली आहे.
आम्हाला गावातील लोकांकडून याबाबतची माहिती मिळाल्यावर प्रत्यक्षात आम्ही याबाबत अधिक चौकशी केली. तेव्हा शासनाची असली कोणतीही योजना नसल्याचे आम्हाला समजते. तरी अशी शासनाची कोणती योजना अंगणवाडी सेविकांमार्फत राबविली जाते का, याची आम्हाला माहिती द्यावी. तशी योजना राबवली जात नसेल तर असे गैरकृत्य करून लोकांची फसवणूक करणाऱ्या त्या अंगणवाडी सेविकांवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
यावेळी उपसरपंच शुभम थोरात ,ग्रामपंचायत सदस्य बालिश थोरात, ग्रामपंचायत सदस्या गीतांजली थोरात, गणेश थोरात आदी उपस्थित होते.
चौकट
सभापती, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन...
अंगणवाडी सेविकांकडून झालेल्या या फसवणुकीबाबतचे निवेदन कालवडे ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समिती सभापती प्रणव ताटे व गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनाही देण्यात आले आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने केली आहे.