संसर्गाच्याबाबतीत मोरीला बोळा अन् दरवाजा सताड उघडा : खंडाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:58+5:302021-05-14T04:38:58+5:30
सातारा : सातारा जिल्हा कोविड-१९ संक्रमणाची अवस्था म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा, अशी झाली आहे, अशी टीका ...
सातारा : सातारा जिल्हा कोविड-१९ संक्रमणाची अवस्था म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा, अशी झाली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.
खंडाईत यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील कोविड-१९ संक्रमणाची आकडेवारी सतत वाढताना दिसत आहे, त्याचबरोबर मृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही; मात्र पोलिसांचा खाक्या दाखवून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून अनेक निर्बंध लादले जात आहेत. कोविड संक्रमणास रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन हाच एकमेव उपाय प्रशासनातर्फे केला जात आहे. सर्वसामान्यांच्या गाड्या जप्त करून आणि त्यांना दंडुका दाखवून हे संक्रमण रोखले जाणे कठीण आहे. जनतेला शास्वत आरोग्य सेवा देणे, ही शासनाची जबाबदारी असताना जर ती मिळत नसेल तर कोणाला दोषी धरणार, जनतेला की शासनाला? असा प्रश्नदेखील खंडाईत यांनी उपस्थित केला आहे.