संतांची शिकवण दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:12 AM2021-02-18T05:12:17+5:302021-02-18T05:12:17+5:30
वारुंजी-मुंढे, ता. कऱ्हाड येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिजामातानगर-वारुंजी येथील संत ...
वारुंजी-मुंढे, ता. कऱ्हाड येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिजामातानगर-वारुंजी येथील संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती व सकल बंजारा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, कऱ्हाड पालिकेचे बांधकाम सभापती किरण पाटील, आनंदराव जमाले, मुंढेचे सरपंच रमेश लवटे, शिवसेना तालुकाध्यक्ष काकासाहेब जाधव, प्रा. दीपक तडाके, भीमशक्ती कुंदन वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, इम्तियाज नदाफ, सविता लगाडे, डॉ. दिलीप जानुगडे, अॅड. विजयसिंह पाटील, अरुण वाघमारे, नायक किसन राठोड, लालू राठोड, बंजारा समाजाचे तालुकाध्यक्ष भीमराव राठोड, उत्सव समितीचे अध्यक्ष हेमंत पवार उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात तसेच सेवाकार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नामदेव पाटील, रमेश लवटे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. अभयसिंह पाटील यांनी केले. आभार रविंद्र पाटील यांनी मानले.
- चौकट
कऱ्हाड दक्षिणेतील पहिलाच उत्सव
शिवछत्रपतींसह विविध राजवटीत सैन्यदलाला रसद पुरवण्याचे काम करणारा तसेच व्यापारी म्हणून ओळखला जाणारा बंजारा समाज कालांतराने रोजीरोटीसाठी भटकंती करू लागला. हा समाज आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. खऱ्या अर्थाने संत सेवालाल महाराज यांच्या विचारधारेची जपणूक करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कऱ्हाड दक्षिणेतून लमाण समाजबांधवांनी एकत्रित संत सेवालाल महाराज जयंती उत्सवाला प्रारंभ केला. हा उत्सव कऱ्हाड दक्षिणेतील पहिला उत्सव ठरला आहे.
फोटो : १७केआरडी०१
कॅप्शन : वारुंजी-मुंढे, ता. कऱ्हाड येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, प्रा. दीपक तडाके, किरण पाटील, आनंदराव जमाले आदी.